आमदार रोहित पवारांनी पुन्हा त्याच सलूनमध्ये कापले केस

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 

टीम हॅलो महाराष्ट्र : मंत्री राम शिंदे यांचा कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात पराभव करून जायंट किल्लर ठरलेले आमदार रोहीत पवार मतदारसंघात चांगलेच सक्रिय आहेत. निवडणुकीच्या आधी त्यांनी ज्या सलूनमध्ये केस कापले होते त्याच सलूनमध्ये त्यांनी पुन्हा एकदा केस कापले आहेत. फेसबुक पोस्टद्वारे त्यांनी ही माहिती दिली आहे. मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी मोठ्या सलूनमध्ये जाण्याऐवजी मतदारसंघात एक चांगला कारागीर असलेल्या ठिकाणी केस कापायला काय हरकत आहे, या विचारामुळे मी या ठिकाणी केस कापत असल्याचे त्यांनी सांगितले.

अखेर त्या शुभेच्छा कामी आल्या

पवार म्हणाले, कर्जतमधल्या ‘ओम नागेश्वर मेन्स पार्लर’ इथं काल केस कापण्यासाठी गेलो होतो. निवडणुकीच्या धावपळीतही याच सलूनमध्ये केस कापले होते, त्यावेळी इथल्या सगळ्या कारागिरांनी मला आमदार होण्यासाठी मनापासून शुभेच्छा दिल्या होत्या. अखेर या शुभेच्छा कामी आल्या आणि लोकांनी मला भरघोस मतांनी आमदार म्हणून निवडून दिलं.

या प्रसंगी शाल आणि श्रीफळ देऊन इथल्या कारागीरांनी रोहित पवार यांचा सत्कार केला. त्यांच्या या प्रेमाच्या सत्काराने रोहित पवार भारावून गेले.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ताज्या बातम्या थेट तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आजच आमच्या 8080944419 या नंबरवर Whatsapp करा आणि लिहा ”Hello News”

Leave a Comment