दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख जमा होतील असे म्हटले होते. याचीच आरटीआयद्वारे विचारणा केली असता माहित नाही असे उत्तर पंतप्रधान कार्यालयातून दिले गेले आहे. २०१६ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदींनी मी पंतप्रधान झाल्यानंतर परदेशात असलेला काळा पैसा परत आणून प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख जमा करण्याचे आश्वासन दिले होते. मोहन कुमार शर्मा यांनी यासंदर्भात पंतप्रधान कार्यालयामधून माहिती मिळण्यासाठी आरटीआय द्वारे अर्ज केला होता. संबंधित माहिती आरटीआय च्या अंतर्गत येत नसून अशी कोणतीही माहिती देण्याची सूचना नसल्याचे पंतप्रधान कार्यालयाने उत्तरामध्ये म्हंटले आहे. विशेष बाब म्हणजे संबंधित माहितीसाठी मोहन कुमार शर्मा यांनी नोटबंदीनंतर १८ दिवसानंतर अर्ज केला होता त्याचे उत्तर आता पंतप्रधान कार्यालयातून मिळाले आहे.
Home ताज्या बातम्या आरटीआय द्वारे विचारले १५ लाख केव्हा येणार.? माहित नाही- पंतप्रधान कार्यालयाचे उत्तर