हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या वातावरणात बदल होताना दिसत आहेत. वातावरणातील गारवा कमी होऊन गर्मी जाणवायला लागली आहे. त्यामुळे आता आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होऊ लागतात. यामुळे उन्हाळ्यामध्ये आरोग्याची विशेष काळजी घेण्याची गरज असते. उन्हाळ्यात आरोग्याची कशी काळजी घ्यायची त्याच्या काही टिप्स सांगणार आहोत. या टिप्स फॉलो करून तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घेऊ शकता.
१) सुक्यामेव्यातील मनुका खाल्ल्यामुळे शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत होते. त्यामुळे दररोज रात्री १०० ग्रॅम मनुके कोमट पाण्यात भिजवून दुसऱ्या दिवशी सकाळी पाण्यासकट ते मनुके खावेत.
२) उन्हाळ्यात शक्यतो तांब्याच्या हंड्यातील पाणी प्यावं. तसंच हातात तांब्याची अंगठी आणि कडं परिधान करावं.
३) उन्हाळ्यात चांदीचे दागिने परिधान करावेत. उदा. चांदीचे पैंजण, हातातील वाक्या, अंगठी यासारखे दागिने घालावेत.
४) जिऱ्याचं पाणी प्यावे
५)अन्नपचन सुरळीत होण्यासाठी आणि शरीरातील दाह कमी करण्यासाठी दही, ताक कधीही उत्तम त्यामुळे जेवणात ताकाचा समावेश हमखास असावा. मात्र ताक रात्रीच्यावेळी पिऊ नये.
६) ज्यांना उष्णतेचा प्रचंड त्रास होतो, अशा व्यक्तींनी अंघोळ झाल्यानंतर पाच ते दहा मिनिटे ओल्या अंगानेच रहावे. त्यामुळे शरीराला थंडावा मिळतो.
७) रात्री काचेच्या भांड्यामध्ये सब्जा भिजत घालून सकाळी खडीसाखर घालून रिकाम्यापोटी घ्यावे.
दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.