हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन : एकेकाळी साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनाही खुलेआम आव्हान देण्याचं धाडस करणारा व शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष व महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांच्या विरोधात निवडणूक लढविणार्या अभिचित बिचकुले यांनी पंढरपूर विधानसभा निवडणूकीसाठी रणशिंग फुंकले आहे. सातारच्या अभिजित बिचुकले यांनी आता पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे. अभिजित बिचुकले यांच्या उमेदवारीमुळे पंढरपूर पोटनिवडणुकीच्या प्रचारात रंगत येणार आहे. ते लवकरच आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत अशी माहिती मिळाली आहे.
अभिजीत बिचुकले हे साताऱ्यातील फेमस व्यक्तिमत्त्व आहे. राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवण्यामुळे ते राज्यभर चर्चेत आले. अभिजीत बिचुकले हे बिग बॉस मराठी सिझन 2 मधील स्पर्धक आहे. त्यांनी आतापर्यंत नगरसेवकापासून ते देशाच्या राष्ट्रपतीपदासाठीपर्यंतच्या अनेक निवडणुका लढवल्या आहेत. साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनाही त्यांनी कित्येकदा खुलेआम आव्हान दिलं आहे. बिग बॉसच्या घरात वादग्रस्त वक्तव्य करणे, टास्क खेळताना नियमांच्या विरुद्ध वागणे, घरातील महिला सदस्यांसोबत फर्ल्ट करणे यासाठी प्रसिद्ध आहे.
बिग बॉसच्या घरात वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यांना अल्पावधीतच प्रसिद्ध मिळाली आहे. अभिजित बिचुकले यांचा सामाजिक, राजकीय, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील वावर कायम चर्चेचा विषय असतो. आतापर्यंत बिचुकले यांनी लोकसभा, विधानसभा अगदी राष्ट्रपतीपदासाठीची निवडणूक लढवून झाली आहे. मात्र, आतापर्यंत कोणत्याची निवडणुकीत त्यांच्या गळ्याच विजयाची माळ पडलेली नाही. तरीदेखील अभिजित बिचुकले हे चिकाटीने मोठमोठ्या निवडणुका लढवत असतात.
राष्ट्रवादीचे माजी आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली होती. त्यानंतर होणारी पोटनिवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांनी प्रतिष्ठेची केली आहे. सांगली आणि जळगाव महानगरापालिकेत ओढावलेल्या नामुष्कीनंतर भाजपने आता पंढरपुरात संपूर्ण राजकीय ताकद पणाला लावायची ठरवली आहे. त्यासाठी भाजपकडून समाधाना आवताडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर राष्ट्रवादीने भारत भालकेंचे सुपुत्र भगीरथ भालके यांना उमेदवारी दिली आहे. दोन्ही उमेदवारांचे अर्ज आज दाखल करण्यात आले. यानिमित्ताने भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी एकमेकांना आव्हान-प्रतिआव्हानही दिले आहे.