इंग्लंडचे गोलंदाज बाॅब विलीस काळाच्या पडद्याआड

0
51
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम, HELLO महाराष्ट्र। इंग्लंडचे माजी कसोटी कर्णधार व फलंदाजांच्या मनात धडकी भरविणारे वेगवान गोलंदाज बाॅब विलीस यांचे बुधवारी वयाच्या ७० व्या वर्षी निधन झाले. निवृत्तीनंतर ते समालोचक म्हणून ओळखले जात होते.

१९८२ ते १९८४ या काळात ते इंग्लंडचे कर्णधार होते. १९८१ च्या तिस-या अॅशेस कसोटीत दुस-या डावात आॅस्ट्रेलियाचे ८ फलंदाज ४३ डावात बाद करत त्यांनी संघाला मालिका जिंकून दिली होती. जास्त रनअप असलेल्या विलीस यांनी कारकिर्दीत ९० कसोटीत ३२५ बळी घेतले होते. ६४ एकदिवसीय सामन्यांत ८० बळी घेतले होते.

साडेसहा फुंटापेक्षा जास्त उंच असलेल्या विलीस यांची गोलंदाजी खेळताना फलंदाज साईट स्क्रिनची उंची वाढविण्याची मागणी करत असत. १९७१ साली पदार्पण केलेले विलीस १९८४ साली निवृत्त झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here