पुणे : इंदू मिलमधील आंबेडकर स्मारकाला माझा विरोध आहे, त्या स्मारकाचा निधी वाडिया हॉस्पिटलला देण्यात यावा अशी विनंती वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी न्यायालयाकडे केली आहे. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, जो निधी आंबेडकर पुतळ्यासाठी किंवा स्मारकाच्या सुशोभीकरणासाठी दिला असेल तो निधी वाडिया हॉस्पिटलसाठी वर्ग करण्याचा आदेश उच्च न्यायालयाने काढावा, अशी माझी विनंती आहे.
मुंबई महानगरपालिकेने वाडिया रुग्णालयाचे 98 कोटी रुपयांचे अनुदान थकवल्याने हे हॉस्पिटल बंद होण्याच्या वाटेवर आहे. याच पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी ही महत्त्वपूर्ण भूमिका घेतली आहे.
काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?
इंदू मिलच्या जागेत बाबासाहेबांचा पुतळा उभारण्याबाबत वाद आहे, माझाही त्याला विरोध आहे. ती इंदू मिलची जागा ही intellactual cause साठी वापरली गेली पाहिजे, असे मत आंबेडकर यांनी यावेळी व्यक्त केले. अटलबिहारी वाजपेयी हे अनेकदा चैत्यभूमीला येऊन गेले आहेत. त्यामुळे त्यांनी ती जागा माहित आहे. म्हणूनच त्यांनी ती जागा इंटरनॅशनल स्कूल ऑफ स्टडीजसाठी त्यांनी दिली होती. मात्र या ठिकाणच्या राजकारण्यांनी ही जागा पुतळ्यासाठी वापरली आहे.
आंबेडकर यांच्या या भूमिकेनंतर राज्य सरकार काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे.