अमरावती प्रतिनिधी | मेळघाट जंगलात आलेल्या इ-वन वाघिणीने मागील 2 महिन्यापासून धुमाकूळ घातला होता.2 जुलै रोजी 7 वर्षाच्या मुलीवर हल्ला चढविला होता तर 30 ऑगस्टला शेतात गेलेल्या शोभाराम चव्हाण ला ठार करून एकाला या वाघीनीने जखमी केले होते. त्यामुळे तिला जेरबंद करण्याचे आव्हान वनविभागाला होते. या वाघिणीला ताबडतोब जेरबंद करण्याची मागणी स्थानिकांनी केली होती.
जीवितहानी लक्षात घेता वन्यजीव विभागाकडून परवानगी घेत इ-वन चा शोध घेण्यास सुरुवात झाली. दरम्यान रविवारी सकाळी 6 वाजता दरम्यान अमरावतील धारणी तालुक्यातील गोलाई जवळच्या जंगलात इ-वन वाघिणीला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आलं आहे.
वाघिणीला जेरबंद करण्यासाठी जंगलातून हत्तींच्या मदतीने वाघिणीचा शोध घेतला गेला. यावेळी वन विभागाचे जवान सर्व तयारीत होते. वाघीण नजरेस दिसताच तिला खास जंगली जनावरांना बेशुद्ध करण्याच्या बंदुकीच्या सहाय्याने तिच्यावर निशाणा साधून तिला बेशुद्ध केले गेले. मंगळवारी इ-वन वाघिणीला गोरेवाडा प्राणिसंग्रहालय येथे पाठविण्यात येणार असल्याची माहिती वनविभागाने दिली आहे.