ठाणे प्रतिनिधी| “ईडी ची चौकशी म्हणजे राजकीय दबाव तंत्र आहे. जो कोणी आवाज उठवतो त्याचा आवाज दडपण्याचा या सरकारचा प्रयत्न आहे.” अशी टीका राज्यातील भाजपा सरकारवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. अशा कठीण प्रसंगी परिवारच मागे उभा राहतो. त्यामुळे परिवारातील माणसे राज ठाकरे यांच्यासोबत गेली तर कोणी टीका करू नये. यातून हेच दिसून येत कि बाळासाहेबांचे संस्कार अजूनही जिवंत आहेत. यामुळेच उद्धव ठाकरेंनी भाऊ राज ठाकरेंची बाजू घेतली. असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.
सांगली – कोल्हापुर भागात ओढवलेल्या पुरस्थितीमध्ये आपला संसार गमावलेल्या आया – बहिणींना संसार उभा करण्यासाठी हातभार लावण्याच्या उद्देशाने ठाणे शहर राष्ट्रवादीच्या वतीने जीवनावश्यक वस्तुंचे साहित्य गुरुवारी रवाना करण्यात आले. यावेळी सुप्रिया सुळे यासुध्दा उपस्थित होत्या. पत्रकारांशी बोलतांना त्यांनी दमानियांचे नाव न घेता टिका केली. या सरकारकडून मनी आणि मसलचा वापर करुन दबाव टाकून अशा प्रकारे चौकशी सुरु असल्याची टिकाही त्यांनी केली. ईडीची जी चौकशी सुरु आहे, ते केवळ आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच हे सरकार करीत असल्याचेही त्यांनी सांगितले.