मोदी सरकारचा मोठा निर्णय; आता जम्मू-काश्मीरमध्येही जमीन खरेदी करता येणार, पण…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । जम्मू-काश्मीमधील कलम 370 हटवल्यानंतर मोदी सरकारनं अजून एक मोठा निर्णय घेतला आहे. जम्मू-काश्मीरमध्ये अन्य राज्यातील नागरिक आता जमीन खरेदी करु शकणार आहेत. ही जमीन उद्योग-व्यवसायासाठी खरेदी करता येणार आहे. मात्र, अन्य राज्यातील लोकांना शेतजमीन खरेदी करता येणार नाही. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून या निर्णयाबाबत नोटिफिकेशन जारी करण्यात आलं आहे.

या नोटिफिकेशननुसार केंद्रीय गृह मंत्रालयाने जम्मू-काश्मीर पुनर्गठन अधिनियम अंतर्गत हा निर्णय घेतला आहे. या अधिनियमानुसार आता जम्मू-काश्मीरमध्ये अन्य राज्यातील नागरिकांना कारखाना, घर किंवा दुकानासाठी जमीन खरेदी करता येणार आहे. (Now in Jammu-Kashmir land can be purchased by peoples of other state)

जम्मू-काश्मीरमध्ये बाहेरचे उद्योग, व्यवसाय यावेत, तिथे रोजगार निर्मिती व्हावी, या उद्देश्यानं हा निर्णय घेण्यात आल्याचं जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी सांगितलं आहे. उद्योग, व्यवसायांसाठी जमीन घेता येणार असली तरी शेतजमीन मात्र जम्मू-काश्मीरमधील नागरिकांनाच घेता येणार आहे. मोदी सरकारनं हा निर्णय घेण्यापूर्वी अन्य राज्यातील नागरिकाला जम्मू-काश्मीरमध्ये जमीन विकत घेता येत नव्हती. मात्र, आता अन्य राज्यातील नागरिकही जम्मू-काश्मीरमध्ये जमीन खरेदी करुन तिथे आपल्या उद्योग-व्यवसाय सुरु करु शकणार आहेत.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा. ब्रेकिंग बातम्यासाठी लॉगइन : www.hellomaharashtra.in

Leave a Comment