एनआयएचे तामिळनाडूत छापे, संशयित सामग्री जप्त

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम, HELLO महाराष्ट्र | राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) गुरूवारी तामिळनाडूतील कोईंबतूर शहरात छापे टाकले. तब्बल पाच ठिकाणी टाकलेल्या छाप्यांमध्ये आतापर्यंत लॅपटॉप, मोबाइल फोन, सिम कार्ड आणि पेन ड्राइव्ह जप्त करण्यात आले. दरम्यान, कोणत्या कारणासाठी एनआयएने छापे टाकले हे अद्याप स्पष्ट झाले नाही.

काही दिवसांपूर्वी एनआयएने कोईंबतूरमध्ये सात ठिकाणी छापे टाकले होते. यामध्ये इसिसशी प्रभावित असलेल्या एकाला अटक करण्यात आली होती. अटक करण्यात आलेला मोहम्मद अझरूद्दीन हा श्रीलंकेत ईस्टर संडेच्या दिवशी बॉम्बस्फोट करणाऱ्या झहरान हाशिमशी प्रभावित झाला होता. त्यानंतर एनआयने याप्रकरणी एक नवी तक्रार दाखल केली होती. दरम्यान, केरळमध्ये असलेल्या इसिस मॉड्यूल्सचा श्रीलंकेतील हल्ल्यात सहभाग आहे किंवा नाही याच्या तपासात सुरक्षा यंत्रणा लागल्या आहेत. यापूर्वी काही संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशीदेखील करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना सोडण्यात आलं होतं. तपासातून काही समोर आले नसले तरी इसिसशी निगडीत काही जणांनी श्रीलंकेतील दहशतवादी आदिलच्या काही फेसबुक पोस्ट शेअर केल्याचे समोर आले होते.

तसेच एका एजन्सीच्या रिपोर्टनुसार, श्रीलंकेतील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड झहरान हाशिम हा सोशल मीडियाच्या माध्यमातून केरळमधील इसिसशी निगडीत लोकांशी तीन वर्षांपासून संपर्कात असल्याची माहिती समोर आली होती. एनआयएने मोहम्मद आशिक, इस्माईल, शमशुद्दीन, जफर सादीक अली आणि शाहुल हमीदला अटक केली होती. रिपोर्टनुसार हे सर्वजण हाशिम आणि त्याच्या साथीदारांच्या संपर्कात होते. एनआयएने यांचाच शोध घेण्यासाठी अनेक ठिकाणी छापे टाकले असल्याचे म्हटले जाते.

यापूर्वी एनआयएने चेन्नई आणि नागपट्टिणम जिल्ह्यातील संशयित ठिकाणी छापे टाकले होते. ९ जुलै रोजी दाखल करण्यात आलेल्या एका केसनुसार संशयित दहशतवादी चेन्नई आणि नागपट्टिणम जिल्हातील राहत असल्याची माहिती होती. याव्यतिरिक्त देशात अन्य ठिकाणी राहणारे लोकही या संघटनेशी निगडीत असून ते सरकारविरोधात कारवाया करण्याचा कट रचत होते. या दशतवाद्यांनी अंसारूल्ला नावाची संघटना तयार केल्याची माहिती समोर आली होती.

Leave a Comment