कंगनाच्या अडचणीत पडणार आणखी भर? ड्रग्ज प्रकरणात मुंबई पोलिसांकडून होऊ शकते चौकशी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । अभिनेत्री कंगना रणौतकडून सतत शिवसेनेवर टीका करणं सुरु केलं आहे तर दुसरीकडे भाजप महाराष्ट्रातील महाविकासआघाडी सरकारला सतत घेरण्याचा प्रयत्न करत आहे. दरम्यान, मुंबई पालिकेनं कंगनाच्या ऑफिसमधील अनधिकृत बांधकामावर हातोडा चालवल्यावर तिच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ होण्याची शक्यता आहे. मुंबई पोलीस कंगनाच्या ड्रग्ज कनेक्शनबाबत चौकशी सुरू करणार आहेत.

आज (शनिवार) पासून कंगनाविरोधात ड्रग्ज कनेक्शनच्या संदर्भात चौकशी सुरू होण्याची शक्यता आहे. मुंबई पोलिसांना शासकीय पत्र प्राप्त झाले असून त्यामध्ये तपासाचे आदेश देण्यात आले आहेत. २०१६ मधील अध्ययन सुमनच्या मुलाखतीचा आधार घेऊन हा तपास केला जाणार आहे. मुलाखतीत कंगनाने कोकेन घेतल्याचं त्याने म्हटलं होतं. शुक्रवारी महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कंगनाच्या ड्रग्ज प्रकरणात प्रश्न उपस्थित केला. कंगनाचा एक्स बॉयफ्रेंड अध्ययन सुमनच्या जुन्या मुलाखतीच्या आधारे हे प्रकरण हाताळलं जाणार आहे. अध्ययन सुमनने दावा केला होता की, कंगनाने ड्रग्स घेतले होते आणि त्याला देखील ड्रग्स घेण्यासाठी भाग पाडले होते.

दरम्यान, कंगनाने ड्रग्स कनेक्शनच्या आरोपाबद्दल ट्विट करत म्हटलं की, ‘आरोप करण्यापूर्वी माझी ड्रग टेस्ट करुन घ्या, माझे कॉल रेकॉर्ड तपासा, जर ड्रग्स पेडलर्ससोबत तुम्हाला काही कनेक्शन आढळले तर मी माझी चूक स्वीकारून कायमची मुंबई सोडेल. तुम्हाला भेटण्यासाठी उत्सूक आहे.’ तर दुसरीकडे, कंगनाच्या ड्रग्स प्रकरणात तिचा एक्स बॉयफ्रेंड अध्ययन सुमनने आपले नाव घेण्याबाबत आक्षेप घेतला आहे. ‘२०१६ मध्ये मी एक मुलाखत दिली होती, त्यामुळे आज मी या वादात पुन्हा ओढण्याचा प्रयत्न होत आहे. कृपया मला या प्रकरणात खेचण्याचा प्रयत्न करु नका.’

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या ला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.