प्रतिनिधी सकलेन मुलाणी : कराड सभासदांनी सहकार्य केल्यानेच सह्याद्री सह. साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाली असुन एक तारखेपासून राज्यात लिंकिंग च्या साह्याने कर्जमाफीची प्रक्रिया सुरू होईल अशी माहिती सहकार मंत्री नामदार बाळासाहेब पाटील यांनी दिली आहे.
कराडच्या सह्याद्री सह.साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाली असुन राज्याचे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील हे या कारखान्याचे अध्यक्ष आहेत. एकवीस जागासाठी 140 उमेदवारी अर्ज़ दाखल झाले होते मात्र उमेदवारी अर्ज मागे घेणेच्या शेवटच्या दिवशी एकवीसच अर्ज़ राहिलेने निवडणुक बिनविरोध झाली. बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वावर शेतकऱ्यांनी विश्वास दाखवला असुन स्वर्गीय यशवंतराव चव्हाण, पी. डी. पाटील यांच्या सहकार्यातून शरद पवार साहेबांची भूमिका सभासदांच्या पुढे कमी कालावधीत मांडली व गेली पाच वर्षे संचालक मंडळाने जे काम केले ते काम सभासदांच्या पुढे ठेवली व सहकार्य करण्याचे आवाहन केले. त्या पद्धतीने सभासदांनी सहकार्य केल्याने सह्याद्री सह. साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाली आहे अशी प्रतिक्रिया सहकार मंत्री नामदार बाळासाहेब पाटील यांनी दिली.
तर एक तारखेपासून लिंकिंग च्या साह्याने कर्जमाफीची प्रक्रिया सुरू होईल .महात्मा फुले कर्जमाफी योजनेच्या माध्यमातून दोन लाखापर्यंत च्या अल्प मुदतीचे कर्ज आहे अशांना लाभ देण्याचा शासनाचा मनोदय आहे. लवकरच अशा शेतकऱ्यांच्या नावावर कर्जमाफीचे पैसे जमा होतील तर रेग्युलर कर्ज भरणाऱ्या साठीही एक समिती नेमण्यात आली आहे त्याच्या माध्यमातून नियमित कर्जफेड करणाऱ्यांना ही न्याय देण्याचा प्रयत्न राहणार आहे असल्याची माहिती सहकार मंत्री नामदार बाळासाहेब पाटील यांनी दिली.