सांगली प्रतिनिधी। राज्यात निवडणूक आयोगाने होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता व निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार शुक्रवार पासून प्रत्यक्ष अर्ज विक्रीस सुरुवात झालीय. अनेकांनी आमदारकीसाठी बाशिंग बांधले असून सर्वानाच उमेदवारी अर्ज दाखल करण्याची घाई झाली. त्यामुळे निवडणूक आयोगाकडून अर्ज विक्रीला सुरवात होते न होते तरच या इच्छुकांनी अर्ज घेऊन जाण्याची तयारी केली. सातारा जिल्ह्यातील कराड दक्षिण आणि कराड उत्तर या दोन मतदार संघासाठी अर्ज विक्रीच्या पहिल्याच दिवशी एकूण 60 अर्जाची विक्री झाली आहे.
कराड दक्षिण मतदारसंघात 21 जणांनी 37 विकत नेले आहेत तर कराड उत्तर मतदारसंघात 11 जणांनी 23 विकत अर्ज नेले आहेत. या उमेदवारांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी निवडणूक अधिकाऱ्यांकडून अर्ज नेले असले तरी शुक्रवारी सायंकाळ पर्यंत एकही अर्ज दाखल झालेला नाही आहे.
दरम्यान कराड दक्षिण मतदार संघातील लढत ही चांगलीच अटीतटीची होणार असल्याचे परिस्थिती आहे.. राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीकडून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे उमेदवार असणार आहेत तर त्यांच्या विरोधात विलासराव देशमुखांचे चुलत जावई अतुल भोसले हे रिंगणात उतरणार आहेत.