कल्याणमध्ये युती फिस्कटली, शिवसैनिकांचं भाजपशी जमेना

प्रातिनिधिक छायाचित्र
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

प्रतिनिधी ठाणे | पश्चिम व पूर्व कल्याण विधानसभेच्या दोन्ही जागांवर शिवसेनेने दावा केला आहे. या परिस्थितीत दोन्ही जागा शिवसेनेला न सोडल्यास भाजपविरोधात उमेदवार देणार असल्याचं सेनेच्या विश्वनाथ भोईर यांनी सांगितलं आहे.

शिवसेना कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात यावेळी कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या उमेदवारीसाठी मुलाखत दिलेले इच्छुक उमेदवार विश्वनाथ भोईर,राजेंद्र देवळेकर,रवी पाटील,श्रेयस समेळ, अरविंद मोरे, साईनाथ तारे, मयूर पाटील उपस्थित होते. कल्याण पूर्व विधानसभा मतदार संघातून शिवसेनेकडून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असलेले रमेश जाधव व महेश गायकवाड या सर्वच इच्छुक उमेदवारांनी भाजपाच्या उमेदवाराला विरोध करीत कोणत्याही परिस्थितीत भाजपाशी दोन हात करण्यासाठी आम्ही सज्ज असल्याचं स्पष्ट केलं.

दोन्ही मतदार संघातील उमेदवारांपैकी एका उमेदवाराला सर्वानुमते अपक्ष उमेदवार म्हणून उभं करून भाजपाची सीट पाडण्याचा निर्धार शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. शिवसेना शहर शाखेबाहेर सर्वच उमेदवारांनी आपला संताप व्यक्त करण्यासाठी घोषणाबाजी केली. कल्याणमध्ये येणाऱ्या काळात युतीबाबत काय घडतं याकडे सर्वांचं लक्ष लागलेले आहे.