काश्मिर मधून अपहरण झालेल्या त्या ‘तीन’ पोलीसांची दहशतवाद्यांकडून गोळ्या झाडून हत्या

Kidnapped Policemen killed by Terrorists in Kashmir
Kidnapped Policemen killed by Terrorists in Kashmir
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

श्रीनगर | जम्मु काश्मिरच्या शोपियान जिल्यामधून अपहरण झालेल्या त्या तीन पोलीसांची दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केल्याची माहीती समोर आली आहे. गोळ्या आरपार गेलेले तीघांचे मृतदेह दक्षिण काश्मिर मधील शोपियन येथे शुक्रवारी सापडल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.

तीन पोलीस आणि एका पोलीसांचा भाऊ यांचे दहशतवाद्यांनी काल रात्री त्यांच्या राहत्या घरातून अपहरण केले होते. आज सकाळी त्या पोलीसांचे मृतदेह दंगम गावात मिळाले. पोलीसाच्या भावाला दहशतवाद्यांनी सोडून दिले असून तो सुखरुप आहे.