बेंगळूरु : श्रीराम सेनेचे प्रमुख प्रमोद मुतालिक यांनी गौरी लंकेश आणि कलबुर्गी यांच्या हत्येच्या पार्श्वभुमीवर खळबळजनक वक्तव्य करुन नव्या वादाला तोंड फोडले आहे. विचारवंत आणि पत्रकारांच्या हत्यांवरुन मोदींना टार्गेट करणार्या विरोधकांवर मुतालिक यांनी हल्लाबोल केला आहे. कर्नाटकात एखाद्या कुत्र्याचा मृत्यु झाला तर त्याला पंतप्रधान नरेंन्द्र मोदी कसे काय जबाबदार असू शकताता असा सवाल मुतालिक यांनी केला आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक मधे ज्या हत्या झाल्या त्या प्रत्येक हत्येवेळी तेथे काँग्रेसची सत्ता होती. असे असूनही कोणीही काँग्रेसला यात धारेवरती धरत नाही. मात्र गौरी लंकेश यांच्या हत्येवरुन मोदींना विनाकारन टार्गेट केले जात आहे असेही ते म्हणाले. पत्रकार गौरी लंकेश, जेष्ठ विचारवंत कलबुर्गी, जेष्ठ समाजसेवक नरेन्द्र दाभोळकर तसेच जेष्ठ विचारवंत गोविंद पानसरे यांच्या हत्येसंदर्भात मुतालिक यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल देशभरातून संतप्त प्रतिक्रीया येत आहेत.