कॅनडात असा साजरा होणार भारतीय स्वातंत्र्यदिन सोहळा

स्वातंत्र्य दिन विशेष   | अमेरिकेत भारतीय वंशाच्या नागरीकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यातल्या त्यात उत्तर अमेरिका प्रांतात तर अनेक भारतीय लोक वास्तव्यास आहेत. कोणी कामानिमित्त तर कोणी उद्योग धंद्याकरता अमेरिकेत स्थायिक झाले आहेत. भारतीय स्वातंत्र्यदिन मात्र हे लोक दरवर्षी आवर्जुन साजरा करतात. दरवर्षी प्रमाणे यंदा ही कॅनडातील टोरोन्टो शहरात स्वातंत्र्यदिना निमित्त १५ अाॅगस्ट रोजी मोठा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला आहे.

टोरेंन्टो शहरातील होणार्या या कार्यक्रमास साधारण ७०,००० लोक जमा होतील असा अंदाज आहे. तसेच यावेळी स्वातंत्र्यदिना निमित्त खास परेड चे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रम नाथन फिलीप्स स्क्वॅअर या ठिकाणी होणार असून बाॅलिवुड अभिनेता जीम्मी शेरगील आणि पंजाबी गायक माल्कीत सिंग हे या कार्यक्रमाचे मुख्य अथिती असणार आहेत.

परदेशात साजरा होणार्या स्वातंत्र्यदिन कार्यक्रमांपैकी टोरेंन्टो येथील कार्यक्रमाचे नेहमीच अरहिवासी भारतीयांना आकर्षण असते. अशा कार्यक्रमांमुळे परदेशी नागरिकांना भारतीय संस्कृती आणि परंपरा याबद्दल माहिती होते.