कोल्हापूर, सतेज औंधकर : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून गाव तिथ कॉग्रेस हा उपक्रम आज पासूूूून कोल्हापूर जिल्ह्यात राबवण्यात सुरूवात झालीय. कोल्हापूरचे पालकमंत्री आणि राज्याचे गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मार्गदर्शनाने गाव तिथं काँग्रेस या उपक्रमाची सुरुवात कोल्हापुरात करण्यात आली.
कोल्हापूरच्या काँग्रेस कमिटीत आज जिल्ह्यातील सर्व काँग्रेसचे तालुका अध्यक्ष युवक कांग्रेस, महिला काँग्रेस, NSUI, सेवादल, सर्व सेलचे पदाधिकारी, आजी माजी जिल्हा परिषद सदस्य , पंचायत समिती सदस्य ,नगरपरिषद सदस्य ग्रामपंचायत सदस्य तसेच तालुक्यातील पक्षाचे सर्व आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी कोल्हापूर पालकमंत्री सतेज पाटील यांनी पहिल्या टप्प्यात ९ तालुक्यातील पदाधिकाऱ्याशी संवाद साधत या उपक्रमाची माहिती दिली. तर दुसऱ्या टप्प्यात 3 तालुक्यातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत.