कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर
दिनांक 15 मार्च पासून चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्रासाठी डिजिटल साईनची सुविधा उपलब्ध करण्यात आली असून प्रमाणपत्राची प्रिंट काढण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयात येण्याची आवश्यकता नाही, अशी माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
महाराष्ट्र शासनाने Pcs.mahaonline.gov.in शासकीय संकेतस्थळावर ऑनलाईन व्हेरिफीकेशन (चारीत्र्य पडताळणी /वर्तणुक दाखला ) ची सुविधा सन 2016 पासून सुरु केली आहे. Pcs.mahaonline.gov.in या पोर्टलवर अर्जदाराने स्वत:चा चारित्र्य पडताळणी फॉर्म भरल्यानंतर या अर्जदाराचे चारित्र्य पडताळणीबाबत ते वास्तव्यास असलेल्या संबंधित पोलीस ठाण्यामार्फत चारित्र्य पडताळणी करून फॉर्म Approved केला जातो.
संबंधित पोलीस ठाण्याकडून फॉर्म Approved केल्यानंतर अर्जदारांच्या मोबाईल नंबरवर PCC Approved by Lokal Police Stationअसा संदेश येतो. त्यानंतर हे प्रकरण पुढील कार्यवाहीकरिता पोलीस अधीक्षक कार्यालयातील विशेष शाखा येथे येते. जिल्हा विशेष शाखा येथे हे प्रकरण तपासणी करून Approved करून Digital Sign केल्यानंतर संबंधित अर्जदाराच्या मोबाईल नंबरवर PCC Approved by SP Office.Download Certificate from your Login असा संदेश येतो. हा संदेश प्राप्त होताच संबंधित अर्जदार यांनी आपल्या Login Account वरून चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्राची प्रिंट काढायची आहे. चारित्र्य पडताळणी प्रिंट घेण्याकरिता पोलीस अधीक्षक कार्यालयात येण्याची आवश्यकता नाही.
दिवसभरातील बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 8080944419 या नंबरवर ”Hello News” टाईप करून त्वरित Whatsapp करा.