खाऊगल्ली | आपल्याला चटपटीत आणि चमचमीत खायला नेहमीच आवडत. पण ते बनवायचा कंटाळा येतो. म्हणूनच आपण आज झटपट बनणारा, पण खायला तेवढेच चमचमीत असे क्रिस्पी कॉर्न कसे बनवायचे पाहुयात. कॉर्न सर्वांनाच खुप आवडतात. मग ते भाजलेला भुट्टा असो व उकडलेले दाणे. क्रिस्पी कॉर्न हा कॉर्नचा मस्त असा चटपटीत पदार्थ आहे.
साहित्य –
१) कॉर्न १ वाटी
२) कॉर्न फ्लोअर १ चमचा
३) तांदळाचे पीठ १ चमचा
४) मीठ
५) तेल
६) काळी मिरपूड अर्धा चमचा
७) हिरवी मिरची (आवडीनुसार)
कृती – कॉर्नमध्ये पाणी आणि मीठ टाकून कुकरमध्ये ३ शिट्टी काढून घ्या.
पेपरवर पसरून गार करा.
गार झाल्यावर एका बाऊलमध्ये कॉर्न, मिरपूड, मीठ, कॉर्न फ्लोअर आणि तांदळाचे पीठ टाकून मिक्स करा.
आता कढईत तेल गरम करून कॉर्न दाणे तळून घ्या.
यात बारीक चिरलेली हिरवी मिरची तळून मिक्स करू शकता.
गरमा गरम सर्व्ह करा.
इतर महत्वाचे –
यामुळे विरोधक गठबंधनाच्या नावाखाली एकत्र : रावसाहेब दानवे
राहुल गांधी आज महाराष्ट्र दौऱ्यावर
डॉ.अमोल कोल्हेचा शिवसेनेला रामराम,’या’ पक्षात करणार प्रवेश