मुंबई प्रतिनिधी | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या, खासदार सुप्रिया सुळे यांना टॅक्सीचालकाच्या मुजोरीचा, अरेरावीचा सामना करावा लागला. खासदार सुळे यांनी ट्विट करत टॅक्सी चालकाने केलेल्या गैरवर्तणूकीची तक्रार थेट रेल्वे मंत्र्यांकडेच केली.
सुप्रिया सुळे यांच्या तक्रारीनंतर टॅक्सी चालक कुलजीतसिंह मलहोत्रा याला अटक करण्यात आली आहे. सुप्रिया सुळे काल देवगिरी एक्स्प्रेसने प्रवास करत होत्या. सुळे यांनी ट्विटमध्ये दिलेल्या माहितीनुसार, कुलजीतसिंह मल्होत्रा नावाचा टॅक्सी चालक दादर टर्मिनस येथे गाडीत प्रवेश करत प्रवाशांना भाड्यासाठी हुज्जत घालत होता. मल्होत्राने सुप्रिया सुळेंना गाठले आणि तो त्यांच्याशी हुज्जत घालू लागला.
सुळे यांनी त्याला दोनदा नकार दिला. मात्र, मल्होत्रा ऐकेचना. त्याने सुप्रिया सुळेना पुढे जाऊ न देता अडवून धरले. इतकेच नाही, तर तो थेट मोबाईल काढून त्यांच्यासोबच सेल्फी काढू लागला. ही माहिती देत सुळे यांनी या टॅक्सी चालकाची ट्विटद्वारे रेल्वे मंत्रालयाकडे तक्रार केली. रेल्वे मंत्रालयाने या प्रकरणाची दखल घ्यावी अशी विनंती त्यांनी केली.
इतर महत्वाच्या बातम्या –
उदयनराजे यांनी केली भाजप ‘प्रवेशाची’ अधिकृत घोषणा; म्हणाले, लढाई ‘रयतेच्या विकासासाठी’
स्वार्थासाठी राजीनामा देणार्या उदयनराजेंकडून निवडणूकीचा खर्च वसूल करावा..
कट्टर शिवसैनिक असल्याने मन स्वस्थ बसू देत नव्हतं ; शिवसेना प्रवेशावेळी भास्कर जाधवांचे उद्गार
‘त्या’ कुत्र्यांची हत्या करणारे अखेर पोलिसांच्या ताब्यात…