गडचिरोली प्रतिनिधी | गडचिरोली जिल्ह्यात गंभीर झाली असुन वीस मार्ग बंद पडुन तीनशे गावांचा संपर्क तुटलाय. भामरागडची पुर परिस्थिती गंभीर बनलीय. हॅलीकॅप्टरने आज जिल्हाधिकारी शेखरसिंग आणि पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी भामरागडच्या पुरपरिस्थितीची पाहणी केली. पर्लकोटा आणि पामुलगौतम नदीच्या पाण्याने चारही बाजुने भामरागडला वेढले असुन तब्बल सहाशे नागरीकाना प्रशासनाने सुरक्षितस्थळी हलवल आहे. भामरागडचा वीजपुरवठा मोबाईल सेवाही पुर्णपणे बंद पडली आहे.
पुरपरिस्थितीमुळे हेलीकॉप्टर उतरु शकले नाही कोठी या दुर्गम पोलीस ठाण्यात पुराचे पाणी गेले होते दोन्ही अधिका-यानी हेलीकॉप्टरने भामरागडसह तालुक्याची हवाई पाहणी केली सेटेलाईट फोनद्वारे प्रशासन तालुका प्रशासनाच्या संपर्कात असुन अजुनही जिल्हयात अनेक मार्ग बंद आहेत. भामरागडपासून सहा किलोमीटर दूर असलेल्या कुमरगुडा नाल्याचे पाणी रस्त्यावरून वाहत असल्याने एका रुग्णवाहिकेसह अनेक पर्यटक या ठिकाणी अडकून पडले होते. रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या नाल्यांना पूर आल्याने मधे अडकलेल्या नागरिकांना समस्यांचा सामना करावा लागला. गडचिरोली लगतची कठाणी तसेच वैनगंगा नदीही आज सकाळपासून दुथडी भरून वाहत होती. सततच्या पावसामुळे कुरखेडा, आरमोरी, गडचिरोली, सिरोंचा, अहेरी व भामरागड तालुक्यातील २०० गावांचा संपर्क जिल्हा मुख्यालयाशी तुटला आहे.