टीम, HELLO महाराष्ट्र | यंदाच्या गणेशोत्सवात झेंडूच्या फुलांना भलताच भाव आहे. शेतकऱ्याच्या फुलाला भाव मिळत असल्यान शेतकरी वर्गात आनंदच वातावरण निर्माण झालेलं दिसत आहे. गणेशोत्सवात झेंडूच्या फुलांना चांगलीच मागणी असते मात्र यंदा पाऊस काही ठिकाणी पाऊस खूपच कमी झाल्यानं म्हणावे असे झेंडूच्या फुलांचे उत्पादन झालं नसल्यानं यंदा बाजारात झेंडूच्या फुलांचे भाव खूपच पेटलेले दिसत आहेत.
सध्या झेंडूच्या फुलांनी बाजार बहरला असून झेंडूची फुले 200 रूपये किलो, शेवंतीची फुल 300 किलो तर मोगरीच्या फुलांना 1 हजार रुपये किलोचा दर मिळत आहे. सध्या ग्राहक मोठ्या प्रमाणात फुलांची खरेदी करत असल्याने फुलांच्या विक्रीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
यंदा काही ठिकाणी पाऊस अगदीच कमी पडल्यानं शेतकऱ्यांमध्ये असमाधानाचे वातावरण होते. पण काही शेतकऱ्यांनी कमी पाण्यात येतील म्हणून झेंडू, शेवंती, मोगरा या फुलांची शेती केली होती. तर काही शेतकऱ्यांना प्यायलाच पाणी नसल्यानं त्यांना कोणतंच पीक घेता आलं नसल्यानं यंदा बाजारात खूपच कमी प्रमाणात फुलांची आवक झाल्याने फुलांचे दर मोठ्या प्रमाणावर वाढलेले दिसत आहेत.