अष्टविनायकांतील एकमेव उजव्या सोंडेचा गणपती

#गणेशोउत्सव२०१९ | अष्टविनायक गणपतींपैकी एक गणपती म्हणजे सिद्धटेकचा सिद्धिविनायक. ह्या गणपतीचे मंदिर अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा या गावापासून ४८ कि. मी अंतरावर पुणे-सोलापूर महामार्गावर स्थित आहे. सिद्धिविनायकाची मूर्ती आणि मंदिर परिसर सिद्धिविनायकाच्या मंदिरातील मूर्ती ही स्वयंभू मूर्ती असून ती ३ फूट उंच आहे. ही मूर्ती उत्तराभिमुख असून या गणपतीची सोंड उजवी आहे. अष्टविनायक पैकी हा असा एकमेव … Read more

जेव्हा विद्यार्थी लिहितात ‘बाप्पाला’ पत्र

सोलापूर प्रतिनिधी | सोलापूर जिल्ह्यातील अरण येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेतील शेकडो विद्यार्थ्यांनी आपल्या लाडक्या गणपती बाप्पाना पत्र लिहून एक आगळा-वेगळा उपक्रम राबवला. विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या या पत्रांचे दररोज परिपाठाच्या वेळी वाचन करण्यात येते. जिल्ह्यात म्हणावा असा पाऊस झाला नाही. त्यामुळे बळीराजा पुरता हवालदिल झाला आहे त्याला लढायला बळ दे, जनावरांना चारा दे, कोल्हापूर,सातारा, सांगलीतील पूरग्रस्तांना … Read more

खुशखबर! गणेशोत्सवाला कोकणात एसटीने जाणाऱ्यांना ई-पासची गरज नाही

मुंबई । अवघ्या काही दिवसांच्या अंतरावर येऊन ठेपलेल्या यंदाच्या गणेशोत्सवाच्या निमित्तानं महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाकडून प्रवाशांसाठी काही खास व्यवस्था करण्यात आल्या आहेत. कोकणात जाण्यासाठी एसटीने प्रवास करताना ई-पासची गरज लागणार नाही. मात्र खासगी वाहनाने प्रवास करताना ई-पास अनिवार्य असणार आहे. कोकणात जाऊ इच्छिणाऱ्या चाकरमान्यांना १२ तारखेपूर्वी कोकणात पोहोचावं लागणार आहे. ज्यांना १२ तारखेनंतर कोकणात जायचं … Read more

तब्बल दोन लाख 78 हजार नवसाच्या मोदकांचे वाटप

हिंगोली प्रतिनिधी | नवसाला पावणारा गणपती म्हणून संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरात ज्याची ख्याती आहे अशा हिंगोली शहरातील विघ्नहर्ता चिंतामणी गणपती मंदिरात रात्रीपासून भाविकांनी दर्शनासाठी रीघ लागली आहे. सकाळी भाविकांसाठी महापूजा झाल्यानंतर मंदिर खुले करण्यात आले.

विशेष म्हणजे या ठिकाणी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना नवसाच्या मोदकांचे वाटप करण्यात येते. तब्बल दोन लाख 78 हजार मोदक भाविकांना वाटप करण्यासाठी मंदिर व्यवस्थापनाने तयार केले आहेत.

तसेच लाखोंच्या संख्येने दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी हिंगोली शहरातील नागरिकांनी जागोजागी फराळाची व्यवस्था केलेली आहे. पावसाचे वातावरण असल्याने मंदिर समितीने वॉटरप्रूफ मंदिराची देखील उभारणी केली आहे.

दुष्काळाचं सावट दूर होऊ दे.. असं साकडं घालत गणरायाला निरोप..!

बीड प्रतिनिधी | जिल्ह्यात आपल्या लाडक्या गणरायाला निरोप देण्यात येतोय. घरगुती तसेच सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणपती विसर्जनाला सुरुवात झालीये.

परळीतील वैद्यनाथ मंदिर परिसरात असणाऱ्या हरिहर तीर्थ या तलावात शहरातील गणपतीचे विसर्जन करण्यात येतंय. दुष्काळाचं सावट यंदाच्या विसर्जनावर दिसून आले, आज गणेश विसर्जन असल्याने परळी नगर पालिकेकडून टँकरच्या सहाय्याने हा तलाव भरण्यात आलाय.

जिल्ह्यावरील दुष्काळाचं सावट दूर होऊ दे.. आणि परतीचा पाऊस जोरदार पडू दे.. असं साकडं घालत गणरायाला निरोप देण्यात येतोय. जिल्ह्यात सर्वत्र शांततेत गणेश विसर्ज सुरु आहे.

पुण्यात साकारला कलम ३७० वर आधारित देखावा

#गणेशोउत्सव२०१९ | पुण्यात गणपतीनिमित्त अनेक देखावे साकारले जात आहेत. यंदा हलत्या देखाव्यांबरोबरच, काहीतरी संदेश देणारे देखावा साकारण्यावर मंडळांचा भर दिसत आहे. त्यात घरचे देखावाही मागे नाहीत. जम्मू काश्मीरमधील कलम 370 रद्द केल्यानंतर त्यावर आधारित देखावा शनिवार पेठेतील संजय तांबोळी यांनी साकारला आहे. त्या देखाव्याला ‘कलम 370 हटवल्यानंतरचा भारत’ असे नाव देण्यात आले आहे. हा देखावा पाहण्यासाठी … Read more

अख्यायिका जेष्ठ गौरीची ….

#गणेशोउत्सव२०१९ | हिंदू देवशास्रात तसेच समाज जीवनात गौरी हे शिवाच्या शक्तीचे आणि गणेशाच्या आईचे रूप मानले जाते. एकदा असुरांच्या त्रासाला कंटाळून सर्व स्रिया महालक्षी गौरीकडे गेल्या आणि आपले सौभाग्य अक्षय करण्याची प्रार्थना केली. त्याला अनुसरून गौरीने असुरांचा संहार केला. शरण आलेल्या पतींना व पृथ्वीतलावरील प्राण्यांना सुखी केले. महालक्ष्मीच्या कृपाशीर्वादाने सौभाग्य प्राप्त झाले अशी आख्यायिका प्रचलित आहे. … Read more

पुण्याच्या दगडूशेठ गणपतीला १७५ किलोचा लाडू अर्पण

पुणे प्रतिनिधी | पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपतीला एका भक्तान मोतीचूर बुंदीचा तब्बल १७५ किलोचा लाडू प्रसाद म्हणून अर्पण केला. ४८ तासांत ६ व्यक्तींच्या मदतीने हा लाडू बनवण्यात आला आहे. पुण्यातील निखिल मालानी यांच्या मार्फत हा १७५ किलोचा लाडूचा प्रसाद गणपतीला अर्पण करण्यात आला आहे. ४८ तासांत ६ कारागिरांच्या मदतीने हा लाडू बनविण्यात आला. हा १७५ किलोचा … Read more

विट्यात मशिदीच्या दारातच होते गणरायाची प्रतिष्ठापना; हिंदू-मुस्लिम ऐक्याच प्रतीक

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे जाती पाती इथे नांदती, सुखी राहण्यास पीरास करतो नवस मराठा, मियाँ मारूतीस… महाकवी गदीमांच्या या चार ओळीतील एकोप्याचा, सलोख्याचा समाज पहावयास असेल तर, विट्याच्या मशिदीसमोर नक्कीच दिसेल. येथील हिंदू – मुस्लिम समाजातील काही युवकांनी समता ग्रुप संचलित गावभागचा राजा गणेश मंडळ सुरू केले आहे. अगदी मशिदीच्या दारातच या मंडळाने त्यांच्या … Read more

असा साजरा केला जातो गौरीचा सण

#गणेशोउत्सव२०१९ | गणेश चतुर्थीच्या या उत्सवात गौरींना अनन्य साधारण महत्व असते. संस्कृत शब्दकोशातील अर्थानुसार गौरी म्हणजे ८ वर्षाची आनाधात्रात अशी पवित्र कन्या तसेच गौरी म्हणजे पृथ्वी, वरुण पत्नी, तुळशीचे झाड, मल्लिका उर्फ जाईची वेल हे अर्थ देखील कोशात दिले आहेत. या आधारेच तेरड्याच्या फुलाची ही गौरी म्हणून पूजा केली जाते. भाद्रपद महिण्यात येणाऱ्या गौरीचे पूजन करुन … Read more