नऊ दिवस नऊ देवी | प्रणव पाटील
श्रध्दे बरोबरच अंधश्रध्दा जन्म घेते असे म्हणतात, त्याचंच उदाहरण आपल्याला काही देवतांबाबत अढळतं. काही देवता या मंगलकारक, शुभ मानल्या गेल्या तर काही देवता भयानक,भूतयोनीतील त्रासदायक मानल्या गेल्या अशा काही देवता ज्यांच्या बद्दल लोकमानसा मधे गैरजमज, गूढ दंत कथा, अंधविश्वास फेर धरुन उभ्या असतात त्यामुळे यातील काही देवतांची पूजा ठाणी ही गावकुसा बाहेर अरेबिया सलेली अढतत. त्यातील काही देवता आपण पाहूया –
१) मरीआई – मरीआई या देवतेची पूजा अनेक गावांमधे प्रचलित असलेली दिसते.या देवीची मूर्ती नसून देवीच्या नावे शेंदूर फासलेला तांदळा(दगड) बसवून त्याची पूजा करतात. या देवीचे मूळ तेलंगणात असून त्या भागातून ही देवी आणि पोतराज ही पध्दत महाराष्ट्रात आली. वर्हाडात याच देवीला महीसम्मा असे म्हणतात. ही देवता साथीच्या रोगांची देवता असून, गावात साथीचा रोग आला की या देवीला बकर्याचा बळी देण्याची प्रथा आहे.रोग निवारण करण्यासाठी या देवीची उपासना केली जाते.
२) शितळादेवी – ग्रामिण जनमानसांमधे अशी समजूत आहे की ग्रामदेवतांच्या कोपामुळे पटकी,वहगवण, फेफरे, आकडी इ. विकार होतात. तसेच तापाची साथ किंवा संसर्गजन्य रोगाची साथ यां पासून वाचण्यासाठी शितळा देवीची पूजा केली जाते. शीतल (थंड) या शब्दाचे अपभ्रंष रुप शितळा असे आहे. या देवीचे स्वरुप हे शेंदूर लावलेला दगडी गोल पाषाण स्वरुपात असून बर्याच ठिकाणी उघड्यावर तीचे मंदिर असते. रोग झाल्या नंतर या देवीच्या नावाने घरात लिंबाचा डाहाळा बांधून ठेवतात. लिंब ही वनस्पती ही शरीरासाठी थंड असते आणि संसर्गजन्य तत्वचारोगावर उपायकारी असल्यामुळे ही पध्दत पडली असावी असे वाटते.
3) हडळ – जी स्त्री बाळांतपणात किंवा प्रसूती काळात मरण पावते त्या स्त्रीचे हडळ या भूतयोनीतील देवतेत रुपांतर होते असे मानले गेले . अशी हडळ हिरवा चूडा हाताता घालते, पिवळी साडीचोळी नेसते, केस मागे सोडते,तिच्या शरीराचा पुढील भाग चांगलाच जाडजूड असून मागील भाग अतिशय कृश असतो, ती तळी,चझाडी, ओसाड वाडे, घरे यांत वास्तव्य करुन राहते. कही वेळा सुंदर स्त्री चे रुप घेऊन पुरुषसहवास करते अशा अनेक दंतकथा प्रचलित आहेत .
भारतात अशा प्रकारे बाळांतपणे मेलेल्या बाईची भिती प्राचीन काळा पासून लोकमानसात आहे त्यामुळे लोक काही वेळा गावकुसा बाहेर हडळ आणि जखिणी या देवीच्या रुपात दगड बसवून अमावस्या पौर्णिमेला पूजा करतात. या देवतेची उत्पत्ती जानमानसाच्या भिती तून तयार झाल्याचे दिसते.
४) डाकीण – पुत्र विरहाने जगणार्या एकलकोंड्या स्त्री च्या मरणा नंतर तीचे डाकीणीत रुपांतर होते आणि चौकात बसून येणार्या जाणार्या लहान मुलांना ती पछडते. अशी या देवते बद्दल अंधश्रध्दा असून तांत्रिक काही लोक या डाकीणीची तांदळा बसवून पूजा करतात. अतृप्त आत्म्यांबद्दल भारतीय जनमानसांत पूर्वी पासून भिती आहे या तूनच या देवतेचा उगम झाला आहे.
प्रणव पाटील
9850903005
(लेखक इतिहासाचे अभ्यासक असून आय.एल.एस महाविद्यालयातून कायद्याचे शिक्षण घेत आहेत).
संदर्भ –
१) देवी कोष खंड ३ -प्र.कृ.प्रभुदेसाई
२)पुराणकथा आणि वास्तवता- दामोदर कोसंबी
३) भारतीय संस्कृती कोष खंड
४) मराठी विश्वकोष खंड.