हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । शरीराला घाम येणे हि चांगली गोष्ट आहे. त्यामुळे जितक्या जास्त प्रमाणात शरीराला घाम येण्यासाठी अनेक जण जास्त प्रमाणात व्यायाम करतात. व्यायाम केल्याने जसे शरीर हलके होते. तसेच अंगातून घाम येणे सुद्धा शरीरासाठी लाभकारक आहे. शरीरातील विषद्रव , अतिरिक्त चरबी बाहेर काढणे जास्त आवश्यक असते. त्यामुळे घाम निघून गेल्यानंतर बऱ्याच वेळा अंगाला खूप घाण वास येतो. आणि हि सर्वात मोठी सतावणारी गोष्ट आहे. त्यासाठी आपण कोणत्या घरगुती उपयांचा वापर करायला हवा हे पाहणार आहोत .
१ अतिरिक्त मोठ्या प्रमाणात घाम येत असेल तर स्वच्छ अंघोळ करणे जास्त महत्वाचे आहे. जर शक्य असेल तर कमीतकमी दिवसातून दोन वेळा अंघोळ करावी अंघोळ करताना गरम पाण्यामध्ये लिंबाच्या पानाचा वापर केला तर शरीराला येणार घामाचा वास कमी होतो.
२ शरीरा मध्ये मोठ्या प्रमाणात बाष्प असेल तर अनेक वेळा सारखा सारखा घाम येतो त्यामुळे अंग व्यवस्थित कोरडे करा.
३. घामाचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच घामापासून येणाऱ्या दुर्गंधीचे प्रमाण कमी करण्यासाठी बाजारात अनेक वेगवगेळ्या वासाचे साबण मिळतात त्याचा वापर केला तरी खूप फरक पडतो.
४. शरीराची स्वच्छता राखणे हे घामापासून बचाव करण्याचा खूप चांगला मार्ग आहे. त्यामुळे आपल्या शरीरावर नको असलेला केस काढून टाकणे जास्त फायदेशीर असणार आहे.
५. पुदिनाच्या तेलाने अंघोळ केल्याने सुद्धा शरीरातील दुर्गंधी नष्ट होते.
६. दिवसभर पायात घट्ट चप्पल घातल्याने सुद्धा अनेक वेळा पायाला दुर्गंधी येते.
७. बाजारात अनेक वेगवेगळे वासाचे तेल उपलब्ध असतात. त्याचा वापर केल्याने सुद्धा घामाचा मोठ्या प्रमाणात वास येत नाही.
८. स्वच्छ धुतलेली कपडे वापरण्याने सुद्धा घामाचा इतक्या मोठ्या प्रमाणात वास येत नाही.
९. रात्री झोपताना वापराच्या बुटामध्ये बेकिंग सोडा टाकून ठेवल्यानंतर सुद्धा त्या बुटाला घामाचा वास येत नाही.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’