चिंता कशाला? मनसोक्त लुटा पावसाचा आनंद; पावसात भिजण्याचे आहेत ‘हे’ फायदे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । मान्सून सुरु झाला कि पावसाच्या सरी बरसायला सुरुवात होते. त्यातूनच पहिल्या पाऊस म्हंटला कि, सर्वाना त्या पावसात भिजण्याची इच्छा सर्वांची असते. पण आपण आजारी पडू अशी सर्वाना भीती असते त्यामुळे पावसात भिजण्याचे अनेक जण टाळतात. परंतु पावसात भिजण्याचे अनेक फायदे आहेत. हे फायदे वाचल्यानंतर तुम्ही पण आनंद लुटाल

पावसात भिजण्याने आपले केस मुलायम होण्यास सुरुवात होते. पावसात भिजयाचे नसेल तर शक्य असल्यास कोणत्याही एखाद्या भांड्यात पावसाचे पाणी जमा करा आणि त्या पाण्याने आपले केस धुवा. पावसाच्या पाण्यात चेहरा धुतल्याने त्वचा उजळते तसेच त्याने त्वचेवरील पुळ्या जातात. पावसाचे पाणी स्वच्छ असते ते पिण्यास सुद्धा हितकारक असते. उन्हाळ्यामध्ये खूप मोट्या प्रमाणात घामोळे होतात. घामोळ्याचा सर्वात जास्त त्रास लहान मुलांना होतो. पाठीवर, मानेवर झालेल्या या घामोळ्यामुळे खूप खाज येते. पावसाच्या पाण्यात आंघोळ केल्याने शरीरातील तापमान योग्य होते आणि घामोळ्यांची समस्या दूर होते. त्यामुळे घामोळ्या जाण्यासाठी एकदा तरी पावसाच्या पाण्यात भिजायला हवे.

काहीं लोकांना उन्हाळ्यात हातापायांवरील त्वचा निघायला लागते. उष्णतेमुळे तर काहींच्या पायांना भेगा पडतात. या भेगांमधून रक्त येते. अशा लोकांसाठी पावसाचे पाणी हे या लोकांसाठी वरदान आहे. पावसाच्या पाण्यामुळे शरीरावरील खाज-खरुज कमी होतात. उष्णतेमुळे पायांच्या भेगा बऱ्या होतात. पावसाच्या पाण्याने त्यामुळे हाता-पायांवर नवीन त्वचा येऊ लागते. त्यामुळे आता सगळीकडे पावसाचा आनंद लुटण्यासाठी लोक बाहेर सहली काढल्या जातात. पण यावर्षी कोरोनाच्या महामारीने सर्वत्र लॉक डाउन आहे. त्यामुळे या वर्षीचा पावसाचा आनंद मनसोक्त लुटता येणार नाही.

Leave a Comment