चीनचा ‘कोरोनाव्हायरस’ जगभर पसरतोय; आतापर्यंत ४०० जणांना संसर्ग, काय आहे ‘कोरोनाव्हायरस’? जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | कोरोनाव्हायरस विषाणूमुळे उद्भवणारा आजार चीनमध्ये पसरत चालला असून चीनमधून बाहेर पडणाऱ्या पर्यटकांमार्फत तो जगभर पसरण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. आतापर्यंत या आजाराने ४०० लोकांना संसर्ग झाला असून मागील आठवड्यात या आजाराने मृत्यू पावलेल्या लोकांची संख्या ९ वर पोहचली आहे. चालू परिस्थितीत थायलंड, जपान आणि दक्षिण कोरियामध्ये या आजाराचे रुग्ण आढळून आले आहेत.

उद्भवणाऱ्या आजाराच्या सुरुवातीच्या टप्प्यात सर्दी, खोकला आणि धाप लागणे ही सामान्य लक्षणे जाणवतात. श्वासनलिकेत उद्भवणाऱ्या अडथळ्यांच्या पुढील टप्प्यात फुफ्फुसांच्या गंभीर दुखापतीकडे हा आजार सरकतो. यावेळी व्यक्तीला श्वास घ्यायलाही अडचणी येत असल्याचं आतापर्यंतच्या रुग्णांच्या पाहणीतून लक्षात आलं आहे. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत न्यूमोनिया, मूत्राशय निकामी होऊन मृत्यूची शक्यताही या आजारामुळे वाढली असल्याचं पहायला मिळत आहे. या आजाराचा प्रसार माणसांसोबत प्राण्यांच्या माध्यमातूनही होत असल्याचं आढळलं आहे.

दरम्यान, अनेक देशांच्या विमानतळावर चीन आणि सिंगापूरमधून येणाऱ्या पर्यटकांची कसून तपासणी करण्यात येत असून योग्य ती खबरदारी घेऊनच त्यांना पुढे पाठवण्यात येत आहे. या आजारावर अद्यापही लस उपलब्ध नसल्याने जगभरातील वैद्यकांसमोर या आजारातून बाहेर पडण्यासाठी काय उपाययोजना कराव्या लागतील याबाबत खलबतं सुरु आहेत.

ब्रेकिंग बातम्या थेट तुमच्या मोबाईलमध्ये मिळवण्यासाठी आमच्या 8080944419 या नंबरवर Whatsapp करा आणि लिहा “HelloNews”