मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ मनी लाँन्ड्रींगच्या केस मुळे पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत. सक्तवसुली संचालनालयाने भुजबळ यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल केला आहे. भुजबळ यांना बुधवारी विशेष सत्र न्यायालयासमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पुत्र पंकज व पुतने समिर यांनाही भुजबळ यांच्यासोबत न्यायालयात हजर राहावे लागणार आहे. भुजबळ यांच्यावर गुन्हा नोंद झाला तर त्यांना पुन्हा जामिनासाठी अर्ज करावा लागणार आहे. काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीच्या मेळाव्यात भुजबळांनी स्वत:वरील भ्रष्टाचाराचे सर्व आरोप खोटे असल्याचे भाष्य केले होते. सक्तवसुली संचालनालयाच्या या कारवाईमुळे छगन भुजबळ पुन्हा एकदा अडचणीत येण्याची शक्यता आहे.