जम्मु काश्मिरमधे दहशतवादी हल्ला, दोन जवान शहीद

0
47
thumbnail 1531482048672
thumbnail 1531482048672
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

श्रीनगर | जम्मु काश्मिरमधील दहशतवादी हल्ल्यात सी.आर.पी.एफ. चे दोन जवान शहीद झाले आहेत. आनंतनाग जिल्ह्यातील शीरपोरामध्ये सकाळी ९ च्या दरम्यान दहशतवाद्यानी हा हल्ला केला आहे. सीआरपीएफने दहशतवाद्यांच्या हल्ल्याला चोख उत्तर दिले. त्यावेळी झालेल्या गोळीबारात सीआरपीएफ चे दोन जवान गंभीर जखमी झाले. जखमी झालेल्या जवानांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले परंतु वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.
मागील काही दिवसांपासून कश्मीर खोऱ्यात दहशदवाद्यांच्या हालचालीं मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. भारतीय लष्कराचा नेमबाज औरंगजेब यास दहशतवाद्यांनी अमानुषपणे मारून टाकून त्याच्या अपहरणाचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल केल्याची घटना ताजी असतानाच दहशतवाद्यांच्या कारवायांना उत आल्याने काश्मिर खोर्यात भीतीचे वातावरण तयार झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here