टीम, HELLO महाराष्ट्र | गुजरातचे आमदार जिग्नेश मेवानी यांनी महाराष्ट्रातही त्यांच्या दलित अधिकार मंचची स्थापना केली आहे. भाजपाला सत्तेतून हटविण्यासाठी त्यांनी सर्वच विरोधी पक्ष-संघटनांना एकत्र येऊन लढा देण्याचं आवाहन केलं आहे. मराठवाड्यातल्या सर्वच जिल्ह्यात जिग्नेश मेवानी सभा आणि शक्ती प्रदर्शन करीत आहेत.
लातूर जिल्ह्यातल्या उदगीरपासून दलित अधिकार मंचाची राज्यात स्थापना करण्यात आली आहे. या निमित्ताने आयोजित केलेल्या सभा स्थळावर जोरदार पाऊस पडला. पाऊस सुरु असतानाही जिग्नेश मेवानी मंचावर आले आणि भाषणाला सुरुवात केली.
मेवाणींचं भाषण सुरु झाल्या नंतर शेकडो लोकांनी पावसातही सभा स्थळ सोडले नाही. जिग्नेश यांच्या सभेसाठी राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड सभा स्थळी आले मात्र ते पाऊस पडत असलेला पाहून निघून गेले, जिग्नेश यांनी मात्र भर पावसातही सभा घेतलीच.