परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे
“जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर यशशिखरे गाठता येतात. जिद्द आणि कष्ट याला मार्गदर्शनाची साथ मिळाल्यास प्रत्येक विद्यार्थी यशस्वी होऊ शकतो, त्यासाठी मार्गदर्शन आणि कसलीही मदत करण्यास आम्ही तत्पर राहू” अशी ग्वाही खा.संजय जाधव यांनी दिली. ते सार्वजनिक शिवजयंतीनिमित्य आयोजीत सत्कार व गुणगौरव कार्यक्रमात बोलत होते.
शिवसृष्टी प्रतिष्ठान व राजे संभाजी प्रतिष्ठान यांनी या कार्यक्रमाचे शुक्रवार दि २१ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता आयोजन केले होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदी अजय चौधरी, सभापतीपदी गंगाप्रसाद आनेराव, दादासाहेब टेंगसे आणि पाथरी पंचायत समिती सभापतीपदी सौ.थोरात यांची निवड यासह गावातील विविध क्षेत्रात नावलौकिक केलेल्या तरुणांचा व विद्यार्थांचाही कानसुर ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करत, शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी प्रमुख पाहूणे म्हणुन सुभाषआबा कोल्हे, विष्णू मांडे, सहसंपर्कप्रमुख प्रा.धोंडगे सर, माणिकअप्पा घुंबरे, उपजिल्हाप्रमुख मधुकर निरपणे, रवींद्र धर्मे, उपजिल्हाप्रमुख रामचंद्र आमले तालुकाप्रमुख मुंजाभाऊ कोल्हे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती एकनाथ शिंदे, पाथरी विधानसभा शिवसेना नेते डॉ . राम शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी अच्युत महाराज शिंदे यांच्या हस्ते खा.जाधव यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी पांडूरंग शिंदे, विष्णू शिंदे, राहुल शिंदे यांच्यासह कानसुर येथील ग्रामस्थानी परिश्रम घेतले.
दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.