दिल्ली | “जेएनयू हॉस्टेलमध्ये प्रवेश करणार्या आणि विद्यार्थ्यांवर हल्ला करणार्यांचे थेट प्रक्षेपण पाहून हे धक्कादायक आणि भयानक आहे. अशा प्रकारची ‘दंडात्मक कारवाई’ सरकारच्या पाठिंब्यानेच होऊ शकते असा आरोप काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि देशाचे माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी केला आहे.
What we are seeing on
— P. Chidambaram (@PChidambaram_IN) January 5, 2020
Live TV is shocking and horrifying. Masked men enter JNU hostels and
attack students.
What is the Police doing? Where is the Police Commissioner?
“आम्ही थेट टीव्हीवर जे पहात आहोत ते धक्कादायक आणि भयानक आहे. मुखवटा घातलेले लोक जेएनयू वसतिगृहात घुसून विद्यार्थ्यांवर हल्ला करतात. पोलिस काय करत आहेत? पोलिस आयुक्त कोठे आहेत?” अशा आशयाचे ट्विट चिदंबरम यांनी केले आहे.
‘हे थेट टीव्हीवर घडत आहे, ही एक दंडात्मक कारवाई आहे आणि केवळ सरकारच्या पाठिंब्यानेच होऊ शकते असं म्हणत चिदंबरम यांनी केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.
If it is happening on live TV, it is an act of impunity and can only happen with the support of the government.
— P. Chidambaram (@PChidambaram_IN) January 5, 2020
This is beyond belief.