नाशिक प्रतिनिधी | भिकन शेख
टिक टॉक या सोशल मीडिया ॲपवर आदिवासी महिलांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या गीतांजली पगार या मुली विरुद्ध अट्रोसिटी कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी आदिवासी समाजाकडून होत आहे. आदिवासी समाज पेठ तालुका व अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद यांच्यातर्फे पेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे यांना निवेदन देण्यात आले.
गितांजली पगार नावाच्या युवतीने आपल्या नव्हरर्या सोबतचा एक व्हिडिओ टिकटाॅक वर शेअर केला होता. त्यामध्ये पगार यांनी आदिवासी महिलांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. आता सदर प्रकार पगार यांच्या चांगलाच अंगलटी आला असून आदिवासी समाजातून त्यांच्यावर टीका होत आहे.
टिक टॉक या ॲप वर आदिवासी महिलांबाबत आक्षेपार्ह व्हिडिओ केल्यामुळे आदिवासी समाजात एक चीड निर्माण झाल्याने त्यासंदर्भात पेठ तालुक्यातील महिला एकत्र येऊन गीतांजली पगार यांचा फोटो जाऊन निषेध करण्यात आला. पेठ पोलिस स्टेशन मध्ये निवेदन देतेवेळी गणेश गवळी निवृत्ती अधिकारी एकनाथ भोये अरुणा वारडे छगन चारोस्कर देविदास कामडी राकेश दळवी चिंतामण खंबाईत नेताजी गावित योगेश गावित विलास जाधव यावेळी उपस्थित होते.