ठाकरेंचा वारस पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी।
महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात प्रभावी असणाऱ्या ठाकरे घराण्यातुन निवडणूक लढवणारी पहिली व्यक्ती म्हणून आदित्य ठाकरेंच नाव आता निश्चित झालं आहे. जनतेची सेवा करण्यासाठी, सर्व जनतेचा आदेश मानत, आज मी विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला केला आहे. सर्व भेदभाव दूर करुन, नवा महाराष्ट्र घडवण्याची “हीच ती वेळ” असं म्हणत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचे जाहीर केले. काल वरळी येथे पार पडलेल्या विजय संकल्प मेळाव्यात त्यांनी ही घोषणा केली.

या मेळाव्यात उपस्थित शिवसेना कार्यकर्ते तसेच पदाधिकाऱ्यांना उद्देशून ते म्हणाले की,”हा जो लढण्याचा निर्णय मी घेतला आहे तो स्वत:साठी नाही आहे, मी जनतेच्या स्वप्नाला साकार करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. हीच ती वेळ आहे बेरोजगारीमुक्त महाराष्ट्र घडविण्याची, कर्जमुक्त महाराष्ट्र घडविण्याची, प्रदूषणमुक्त महाराष्ट्र घडविण्याची, एक सुजलाम् सुफलाम्, हिरवागार, भगवा, सुशिक्षित आणि सुरक्षित महाराष्ट्र घडविण्याची!”

निवडणूक लढवण्याची घोषणा करत आदित्य ठाकरे पुढे म्हणाले की, “जर आपली परवानगी असेल, विद्यमान आमदारांची परवानगी असेल आणि शिवसैनिकांची परवानगी असेल तर मी शिवरायांच्या साक्षीने, सर्व महापुरुषांच्या साक्षीने, माझ्या आजी-आजोबांच्या साक्षीने मी निवडणुक लढविणार ही घोषणा करतो.” आदित्य ठाकरे यांच्या वरळीतील या घोषणेनंतर सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आदित्य वरळी दक्षिण विधानसभा मतदार संघातून मधून विधानसभा निवडणूक लढणार असल्याचे निश्चित झाले आहे.