दिल्ली | ट्रम्प तात्या या नावाने सोशल मिडियावर प्रसिद्ध असणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यंदाच्या प्रसासत्ताक दिनी भारत दौर्यावर येणार आहेत. जगावर पाटीलकी गाजवू पाहणाऱ्या बलाढ्य महासत्तेच्या राष्ट्रध्यक्षांना भारताने आपल्या प्रजासत्ताक दिनाचे निमंत्रण दिले आहे. वास्तविक पाहता हे निमंत्रण एप्रिल मध्ये देण्यात आले होते परंतु अद्याप यावर अमेरिकेकडून उत्तर देण्यात आलेले नाही. प्रसार माध्यमात या निमंत्रणाच्या चर्चा काल पासून सुरु झाल्या आहेत.
यापूर्वी अमिरीकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा २०१५ सालच्या भारतीय प्रजासत्ताक दिनाचे पाहुणे होते. डोनाल्ड ट्रप यांनी जर निमंत्रण स्वीकारले तर भारतीय परराष्ट्र धोरणाचा तो मोठा विजय असेल. तसेच भारताचा आंतरराष्ट्रीय राजकारणात दबदबा वाढवण्यासाठी हा पाहुणचार उपयोगी ठरणार आहे. ट्रप तात्या या लाडक्या नावाने महाराष्ट्राच्या सोशल मीडियात प्रसिद्ध असणारे डोनाल्ड ट्रम्प जर भारतात आले तर महाराष्ट्रातील सोशल मीडियाला उधाण येणार आहे हे मात्र नक्की आहे.