मुंबई : फेमिना मिस इंडिया २०१८ स्पर्धेच्या निकालाबाबत सर्वांनाच उत्सुकता लागून राहीली असणार यात वाद नाही. यंदाच्यावर्षी मिस इंडियाचा मुकुट कोणाला मिळणार याबाबत देशभरात जोरदार चर्चा सुरु आहे. भारतातील सौदर्यजगतामधे फेमिना मिस इंडिया स्पर्धा सर्वोच्च मानली जाते. फेमिना मिस इंडिया २०१८ स्पर्धेची अंतिम फेरि मंगळवारी संध्याकळी मुंबई येथे पार पडली. अतिशय रंगतदार झालेल्या या अंतिम फेरिमधे तमिळनाडूच्या अनुकृती वास हीने बाजी मारत फेमिना मिस इंडिया २०१८ चा किताब मिळवला आहे.
फर्स्ट रनरअप म्हणुन हैदराबादच्या मिनाक्षि चौधरी हिला तर सेकन्ड रनरअप म्हणुन आंध्र प्रदेशच्या श्रेया राव कामावारापू हीला गौरविण्यात आले आहे. करण जोहर आणि आयुषमान खुराणा यांनी होस्ट केलेल्या या स्पर्धेदरम्यान बोलिवुड कलाकार माधुरी दिक्षित, करिना कपुर आणि जेकलीन फर्नांडीस यांनीही आपली आदाकारी दाखवली.
पंचांच्या पॅनेलमधे मलायका अरोरा, बोबी देओल, कुणाल कपुर आदी बोलिवुड कलाकार होते तसेच माजी क्रिकेटपटू इर्फान पठान हासुद्धा होता. मिस वर्ड २०१७ चा किताब मिळालेली मानुशी चिल्लर, मिस युनायटेड कौन्टिनंट्स साना दुआ यांचाही पंचांच्या पॅनेलमधे समावेश होता.
मिस इंडिया स्पर्धेत एकुण ३० स्पर्धक सहभागी झाले होते. मिस इंडियाचा किताब मिळालेली अनुक्रीथी वास आता मिस वर्ड स्पर्धेमधे भारताचे प्रतिनिधीत्व करेल तर फर्स्ट आणि सेकन्ड रनरअप म्हणुन गौरवण्यात आलेल्या उर्वरीत दोघी मिस ग्रेंड इंटरनेशनल २०१८ तसेच मिस युनायटेड कौन्टिनंट्स २०१८ मधे भारताचे प्रतिनिधीत्व करतील.