तुमसरचे भाजप आमदार चरण वाघमारे यांना अटक, महिला पोलीसाचा विनयभंग केल्याचा आरोप

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

भंडारा प्रतिनिधी। तुमसर पोलीस स्टेशनमधील महिला पोलीस उपनिरीक्षक यांच्या विनयभंग प्रकरणी भाजप आमदाराला अटक करण्यात आलीये. महिला पोलीस उपनिरीक्षक, यांनी 18 सप्टेंबरला पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. तक्रारीवरुन 354 कलम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल केल्यानंतर विद्यमान आमदार चरण वाघमारे यांना भंडारा पोलीस स्टेशनमध्ये अटक करण्यात आली.

आज विद्यमान आमदार चरण वाघमारे यांना अटक करून भंडारा पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आल. संपूर्ण कारवाईनंतर त्यांना तुमसरला रवाना करण्यात आल. तिथं भाजप कार्यकर्त्यांची गर्दी झाल्यान इथं पोलिसांनी कलम 144 लागू केली आहे.

16 सप्टेंबरला तुमसर बाजार समितीमध्ये कामगारांच्या सुरक्षा किट वाटपाचे काम रात्री उशिरा पर्यंत सुरू होत. दरम्यान नागरिकांना सुरक्षा देण्यासाठी महिला पोलीसही उपस्थित होत्या. यावेळी महिला उपनिरीक्षक यांनी तिथे उपस्थित असलेल्या गर्भवती महिलेला तु अशा अवस्थेत घरी कधी जाणार? अशी विचारणार केली. दरम्यान तिथे उपस्थित शहर अध्यक्ष अनिल जिभकाटे यांनी महिला अधिकाऱ्यांना तुम्ही त्यांच्या घरी पेटी पोहचवून देणार अस म्हटले. यानंतर वादाला सुरुवात झाली. अधिकाऱ्यांनी त्यांना असे न बोलण्याची विनंती केली मात्र जिभकाटे यांनी त्यांच्याशी भांडण सुरू करत त्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ सुरू केली. त्यानंतर तिथे आमदार चरण वाघमारे आले त्यांनी या भांडणात उडी घेतली.

या तक्रारीवरून आमदार आणि शहर अध्यक्ष यांच्या विरुद्ध 353, 354, 472, 504,506, 34 नुसार गुन्हे दाखल करण्यात आले होते. याच प्रकरणी आज आमदार वाघमारे यांना सकाळी जबाब घेण्यासाठी भंडारा पोलीस ठाण्यात बोलवण्यात आल.