‘तो’ वादग्रस्त व्हिडीओ युट्युबवरून हटवा; गृहमंत्री अनिल देशमुखांचे निर्देश

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम हॅलो महाराष्ट्र : पंतप्रधान नरेन्द्र मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी पुस्तकाद्वारे करण्यात आल्या नंतर आता व्हिडिओतून पंतप्रधान मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी केली आहे. यामुळे पुन्हा नवा वादाला तोंड फुटले आहे. हा वादग्रस्त व्हिडीओ युटूबवरून हटवण्याचे आदेश गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले आहेत. युट्युबला तशी सूचना केल्याची माहिती अनिल देशमुख यांनी दिली आहे.

दरम्यान, खासदार संभाजीराजे यांनी या व्हिडीओ वरून तीव्र संताप व्यक्त केला आहे. संभाजी राजेंनी ट्विटरवरून आपला संताप व्यक्त केला. त्यांनी म्हंटले की, पुस्तक झालं आता व्हिडीओ आला. हे अशोभनीय, असह्य तसेच निंदनीय आहे. संबंधित पक्षाने यावर आपली भूमिका स्पष्ट करावी. केंद्र सरकारने चौकशी करून दोषींवर तात्काळ कारवाई करावी.

पुढे त्यांनी म्हंटले, आम्हा शिवभक्तांसाठी महाराज सर्वस्व आहेत. शिवभक्तांच्या भावना तीव्र आहेत. सरकारची जबाबदारी आहे, आमच्या भावनांची कदर करत अश्या गोष्टी होऊ नयेत यासाठी दक्षता घ्यावी.सर्व राजकीय पक्षांना-कार्यकर्त्यांना विनंती आहे, कोणीही गलिच्छ राजकारणासाठी महाराजांच्या प्रतिमेचा गैरवापर करु नये.

Leave a Comment