अमरावती प्रतिनिधी । अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे शहरात प्रेम प्रकरणातून ६ जानेवारीला एका १८ वर्षीय महाविद्यायलीन तरुणीची चाकूने भोसकून एका माथेफेरूने निर्घृण हत्या केली होती. त्यानंतर या माथे फेरूने स्वतःही चाकूने वार करून घेतले होते. दरम्यान माझ्या मुलीच्या हत्येमागे ठाणेदारच असल्याचं धक्कादायक आरोप तरुणीच्या आईने केला होता. त्यानंतर रवींद्र सोनवणे या ठाणेदाराचे निलंबन करून चौकशी करण्यात आली होती. आज या चौकशीचा अहवाल समोर आला असून ठाणेदार रवींद्र सोनवणे याने मुलीच्या घरी जाऊन तिच्याशी जवळीक साधल्याचे चौकशी अहवालातून समोर आले आहे. त्यामुळे तरुणीशी जवळीक करणे ठाणेदाराला चांगलेच भोवले आहे.
या प्रकरणी आरोपी ठाणेदार रविंद्र सोनवणे याला पोलिसांनी अटक केली आहे. सुरक्षेची जबाबदारी असणाऱ्याच एका पोलीस अधिकाऱ्यांने एका तरुणीचा छळ केल्याने आता पोलिसांच्या विश्वासार्हतेवर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तरुणीच्या हत्येच्या काही दिवसापूर्वी आरोपी सागर तितुरमारे याच्या विरोधात तक्रार देऊनही ठाणेदार रवींद्र सोनवणे यांनी कुठलीही कारवाई न केल्याचा आरोप करत पीडित तरुणीच्या आईने जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्याकडे ठाणेदार रवींद्र सोनवणे यांच्या विरोधात तक्रार दाखल करून त्यांची सखोल चौकशी करण्याची मागणी केली होती.
हत्येच्या काही दिवस अगोदर ठाणेदार हा माझ्या मुलीला भेटायला व जबरदस्तीने जेवायला घरी येत होते. तसेच ते तिला वारंवार फोन करून त्रासही देत होते. तिला कॉलेजमध्ये भेटायला जात होते. वेगवेगळ्या नंबर वरून ठाणेदार माझ्या मुलीला त्रास देत होता असाही गंभीर आरोप हत्या झालेल्या तरुणीच्या आईने केला होता.
दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.