दसरा विशेष | वर्षभरात आपण वेगवेगळे सण साजरे करतो. प्रत्येक सणाचं महत्त्व असतंच. पण या सगळ्या सणांपैकी ‘साडेतीन शुभ मुहूर्त’ मानले जातात. दसरा, गुढीपाडवा, अक्षय्य तृतीया हे तीन मुहूर्त आणि कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजेच ‘बलिप्रतिपदा’ हे ते साडेतीन मुहूर्त होय. हिंदू संस्कृतीत या सणांचं महत्त्व काही औरच असतं. कोणत्याही कार्याची सुरुवात करण्यासाठी हे दिवस उत्तम मानले जातात. या दिवशी लोक कपडे, इलेक्ट्रॉनिक वस्तू, सोनं, गाडी, घर यांसारख्या मौल्यवान वस्तूंची खरेदी आवर्जून करतात.