हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । अनेक वेळा लहान मुलांपासून मोठ्या मुलांपर्यंत अनेकांनी दात किडण्याचे प्रकार समोर येत आहेत. लहान मुलांना तरी चॉकलेट. बिस्कीट खाण्याची जास्त सवय असते त्यामुळे त्याचे दात लहान असतानाच किडतात. पण अनेक वेळा मोठ्या लोकांना सुद्धा दात किडीच्या समस्या निर्माण होतात. त्याचे कारण म्हणजे दातांची नीट न घेतलेली काळीज होय . पण अनेक वेळा खूप काळजी घेऊन सुद्धा दात किडतात. मात्र या वेळी त्याची कारणे हि आपल्या आरोग्याशी संबंधित आहेत.
मानवाच्या शरीरात जबडा तयार करण्याचे जे जीन्स आहेत त्याचा संबंध हा लठ्ठपणा साठी सुद्धा गृहीत धरला जातो. एकाद्या वक्तीचा लठ्ठपणा हा त्याच्या अनुवांशिक गुणांशी संबंधित आहे. त्याच दृष्टीने लठ्ठपणा आणि दात किडणे या गोष्टी एकमेकांशी निगडित आहेत. स्वीडन च्या यूमिया युनिव्हर्सिटी च्या संशोधकांनी त्यावर अभ्यास केला आहे. त्यानुसार दात हा आपल्या शरीराचा महत्वाचा भाग आहे. त्यामुळे हृदयरोग आणि दात किडणे हे एकमेकांशी संबंधित गोष्टी आहेत. नेचर कॉम्युनिकेशन या जर्नल मध्ये ९ इंटरनॅशनल क्लिनिकल गोष्टींचा अभ्यास करून समावेश करण्यात आला आहे.
या रिसर्च मध्ये अभ्यासकांनी ध्रुम्रपान , हृदयरोग, लठठपणा, शिक्षण आणि व्यक्तिमत्त्व याचा अभ्यास केला आहे. या रिसर्च मध्ये ४ लाख ५१ हजार लोकांच्या समावेश करण्यात आला होता. प्रीस्टाल पॉप्युलेशन हेल्थ इन्स्टिट्यूशन चे प्रमुख सायमन हवर्थ म्हणाले कि, या अभ्यासाचा वापर भविष्यात ज्या लोकांना लोकांना दाताचा आजार होण्याची शक्यता आहे. हे लोक ओळखले जाऊ शकतो.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’