वर्धा प्रतिनिधी। वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट शहरा लगत असलेल्या पोहचदार बगीच्या जवळील तलावात उडी घेऊन एका ५० वर्षीय इसमान आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या तलावात प्रेत तरंगत असल्याचे नागरीकांच्या लक्षात येताच परिसरात एकच खळबळ उडाली होती. दिलीप म्हैसकर असं या इसमाचा नाव आहे.
या इसमाचा मृतदेह हा तलावावर तरंगत असल्याचं नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी पोलिसांना ही माहिती दिली. ही माहिती मिळताच पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. आणि या इसमाला बाहेर काढून त्याचा पंचनामा केला. आत्महत्या केलेल्या इसमाचा पुतण्या कुणाल मैस्कर याने पोलिसात दिलेल्या माहितीनुसार दिलीपला दारूच व्यसन होते.
त्याच्या या व्यसनाला कंटाळून त्याची पत्नी ८ वर्षापुर्वी त्याला सोडून गेली होती. तेव्हापासून तो एकटाच घरी राहत होता. त्यान या व्यसनातूनच तलावात उडी घेऊन आत्महत्या केली असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येतोय. घटनेचा पुढील तपास हिंगणघाट पोलिस करीत आहे.