दीपिका आणि रणवीर ची बंगळूरात दिमाखात एन्ट्री

Dipika Padukon Marriage
Dipika Padukon Marriage
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बंगळूरु | दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांचा लग्नसोहळा नुकताच इटली येथे पार पडला. अतिशय खासगीत पार पडलेल्या या लग्नसोहळ्यात केवळ रणवीर व दीपिकाच्या अतिशय जवळच्या नातेवाईकांना आमंत्रण होते. त्यामुळे येत्या २१ नोव्हेंबरला बेंगळुरू येथे आणि यानंतर २८ नोव्हेंबरला मुंबईत दीपवीरच्या लग्नाचे रिसेप्शन होणार आहे. तूर्तास यापैकी पहिल्या रिसेप्शनची जोरदार तयारी सुरु आहे. दीपिका व रणवीर आज सकाळी या रिसेप्शनसाठी बेंगळुरुला रवाना झालेत.

बंगळूरुत पोहोचण्यापूर्वीचा दिपीका आणि रणवीर यांचा मुंबई विमानतळावरील एक फोटो सध्या सोशल मिडीयावर वायरल होताना दिसत आहे. सदर फोटोत दोघेही पांढर्या रंगाच्या आॅऊटफिट मधे दिसत असून बंगळूरुच्या रिशेप्शन पार्टीच्या तयारीत गुंग असल्याचे वाटत आहे.

दिपिकाच्या गळ्यातील मंगळसुत्र आणि लाल चुड्यांनी यावेळी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. दोघेही एकमेकांसोबत आनंदी दिसत असून ते हसत खेळत मिडीयाच्या केमेर्यांना सामोरे गेले.