देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजनांमुळे माझ तिकीट कापलं – एकनाथ खडसे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम हॅलो महाराष्ट्र – देवेंद्र फडणवीसांवर अप्रत्यक्ष टीका करणाऱ्या एकनाथ खडसे यांनी फडणवीस यांचे नाव घेऊन त्यांच्यावर तिकीट कापल्याचा आरोप केला आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा आरोप केला आहे. एकनाथ खडसे यांनी म्हंटले की, मला सांगायला काहीही अडचण नाही की देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन यांच्या सारख्या नेत्यांनी मला तिकीट न देण्यासाठी भाजपच्या कोअर ग्रुपमध्ये नाराजी व्यक्त केली होती.

खडसे म्हणाले की, मला तिकीट का नाकारलं याबाबत मला कोणतही स्पष्टीकरण देण्यात आलं नाही. स्वतःच राजकारण सरळ व्हावं यासाठी नाथा भाऊंना राजकारणातून संपवण्याचा हा डाव आहे. मला जाणीवपूर्वक राजकारणातून संपवले जात आहे.

गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त भगवान गडावर भाषण करताना एकनाथ खडसे यांनी फडणवीस यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली होती. पक्षावरची नाराजी खडसे यांनी उघड उघड बोलून दाखवली होती.