देशातला पहिला पोलीस उपनिरीक्षक ‘ रोबो ‘ केरळ च्या गृह खात्यात रुजू

0
43
Untitled design
Untitled design
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

केरळ प्रतिनिध |  देशातला पहिला रोबो गृह खात्यात कार्यरत झाला आहे. या रोबोला पोलीस उपनिरीक्षक या पदाची जबाबदारी केरळ गृह खात्याने दिली आहे. केरळ चे मुख्यमंत्री पिनरई विजयन यांनी देशातील पहिल्या मानवी रोबो पोलीस ‘ केपी- बॉट ‘ चे उदघाटन आज केले.

      या रोबो चं वैशिष्ट्य म्हणजे हा भारतातील पहिला ह्युमनॉइड रोबो आहे तर जगातील चौथा आहे. केरळ राज्याच्या च्या प्रत्येक जिल्ह्याच्या पोलीस आयुक्त कार्यालयासमोर तो उभा राहून आपलं कर्तव्य पार पाडणार आहे. अद्याप त्याला वेतन किती द्यायचे हे केरळ सरकारने ठरलेवलं नाही.

     माहिती गोळा करणे तसेच पोलिसांच्या कामगिरीत सुधारणा घडवून आणणे व मुख्यालयात आलेल्या नागरिकांचे व पोलिसांचे स्वागत करणे आणि गरजेनुसार त्यांना निश्चित कार्यालयात जाण्याचे मार्ग सांगणे इत्यादी कर्तव्य बजावण्याचे काम या ‘ केपी- बॉट’ चे असणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here