पुणे | सुनिल शेवरे
६२ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त प्रभाग क्र.२८ मधील डायस प्लॉट चौकातील प्रभात प्रिंटिंग प्रेस जवळ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या आणि सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रस्तावनेत धम्म चक्र प्रवर्तन चे महत्व आणि सद्य सामाजिक, धार्मिक परीस्थिती या विषयांवर प्रामुख्याने विचारमंथन झाले.
राजेंद्र गायकवाड़ म्हणाले “इतिहासातील सामाजिक परिस्थिति शैक्षणिक परिस्थिति यांच्यात बदल झाला त्यामध्ये प्रामुख्याने बहुजन महामातांचा बहुमूल्य वाटा आहे ” असे मत व्यक्त केले तसेच धम्माचा इतिहास थोडक्यात सांगितला. यावेळी बहुजन मुक्ति पार्टी शहर अध्यक्ष शतायु भगळे,भारत मुक्ति मोर्चा उपाध्यक्ष राजेंद्र गायकवाड़, प्रभाग क्र २८ यूनिट कार्यकर्ते सूरज कांबळे, निखिल गायकवाड़, प्रकाश हल्ले इत्यादी उपस्थित होते.