नगरमध्ये भाजप उमेदवारांच्या मुलाखतीत धक्काबुक्की

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अहमदनगर प्रतिनिधी | भारतीय जनता पार्टीच्या विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारांच्या मुलाखतीमध्ये आजी-माजी नगरसेविकांच्या पुत्रांमध्ये जोरदार धक्काबुक्की झाली आहे. या प्रकारानंतर पक्षनिरीक्षकानी या प्रकरणाची सारवासारव करत “हे घरातील भांडण आहे आवाज तर येणारच, पक्ष जिवंत असल्याचं हे चिन्ह आहे” असं म्हटलं आहे.

भारतीय जनता पार्टीने बुधवारी सकाळपासूनच अहमदनगर जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या मुलाखती घ्यायला सुरवात केली होती. दुपारी उशिरा मुलाखती सुरू झाल्याने रात्री सात वाजेपर्यंत या मुलाखतीचा कार्यक्रम चालु होता. संध्याकाळी सर्वात शेवटी अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघासाठी इच्छुक उमेदवार आले होते. या दरम्यान चेष्टा-मस्करी मध्ये दोन आजी-माजी नगरसेवकांच्या पुत्रांमध्ये चांगली झोंबाझोंबी झाली. शेवटी हे प्रकरण थेट भाजपचे निरीक्षक आमदार रामदास आंबटकर यांच्या पर्यंत पोहोचले मात्र त्यांनी पत्रकारांशी बोलताना असा काही प्रकार घडला नसल्यचे म्हटले आहे.

परंतु घरामध्ये भांड्याला भांड तर लागतं आणि त्याचा आवाज येतो अशी पुष्टी ही त्यांनी यावेळी दिली. पण नगर शहर विधानसभा उमेदवारीबाबत चांगलीच रस्सीखेच चालू असून माजी खासदार दिलीप गांधी यांचे पुत्र सुरेंद्र गांधी भाजपचे ज्येष्ठ नेते अभय आगरकर महापौर बाबासाहेब वाकळे हे नगर शहर विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढविण्यास इच्छूक असून ही जागा आता नेमकी कोणाकडे जाते यावर सर्वांचेच भवितव्य अवलंबून राहणार आहे.

Leave a Comment