नववर्षी गर्लफ्रेंड ला द्या हे गिफ्ट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

#HappyNewYear2020 | गर्लफ्रेंडला गिफ्ट द्यायचं म्हटलं की सगळ्यांनाच मोठा प्रश्न पडतो की कोणतं गिफ्ट दिल्यावर ती जास्त खूष होईल. साधारणत: सर्व मुलं गर्लफ्रेंड ला गिफ्ट देताना कपडे, सॅंडल, घड्याळ किंवा सुगंधी अत्तर याचाच विचार करतात. परंतु या जुन्या गोष्टीच्या आयडिया मुळे क्वचितच एखादी मुलगी इम्प्रेस होईल. जर तुम्हाला नवीन वर्षानिमित्त तुमच्या प्रिय गर्लफ्रेंडला काहीतरी हटके गिफ्ट देऊन तिच्यावर इम्प्रेशन जमावयचंय तर मग या खाली दिलेल्या गिफ्ट्सचा नक्की विचार करा.

१) नेहमीच काहीतरी महागडं गिफ्ट घेतल्यावरच मुली इम्प्रेस होतात असं नाही. कधी कधी तुम्ही प्रेमाने घेतलेली एखादी छोटीशी गोष्टसुद्धा मोठा प्रभाव पाडून जाते. तेव्हा तिला आवडणारं एखादं फुल किंवा गाडीचं किचन ही गिफ्ट म्हणुन उत्तम ठरु शकतं.

२) नवीन वर्षानिमित्त गर्लफ्रेंडला घेऊन कुठेतरी दूर फिरायला जाणं सुद्धा एक गिफ्ट होऊ शकतं. यामुळे दोघांना एकांत मिळेल आणि येणार्या वर्षात तुमच्यातील नातं आणखीन फुलेल.

३) स्त्रिया आणि दागिने यांचं नातं तसं जुनंच आहे. त्यामुळे नवीन वर्षानिमित्त तुम्ही तुमच्या गर्लफ्रेंडला एखादा दागिना सुद्धा घेऊ शकता. दागिन्यांचे अनेक प्रकार बाजारात उपलब्ध आहेत. इअर रिंग, ब्रसलेट, बंगल्स, नेकलेस सारखी दागिने विविध ठिकाणी उपलब्ध आहेत.

४) गिफ्ट देताना याचा विचार करावा की समोरच्याला गिफ्ट नुसतं आवडलच नाही पाहिजे तर त्याचा जोरदार प्रभाव देखील पडला पाहिजे. तेव्हा तुम्ही घेतलेलं गिफ्ट आकर्षक आणि तिच्या गरजेचं असेल याची काळजी घ्या.

५) गिटार किंवा तिच्या आवडीचं एखादं वाद्य हे उत्तम गिफ्ट ठरु शकतं.

बाजारात अनेक दुकानांमधे वेगवेगळी आकर्षक गिफ्ट्स उपलब्ध आहेत. तसेच तुम्ही घरबसल्या ही गिफ्ट घेऊ शकता. यासाठी अनेक ऑनलाइन वेबसाईट आपल्याला मदत करतील. ऑनलाइन वेबसाईटवर अनेक सवलतीसह खरेदीकरून पैसे ही वाचतावता येतील आणि गर्लफ्रेंड ला ही खुश ठेवता येईल.

इतर महत्वाचे –

३१ डिसेंबरला नाईट आऊट करताय? मग या गोष्टींची काळजी घ्या

आवडत्या व्यक्तीला इंप्रेस करायचंय? मग हे कराच

या पाच कारणांमूळे हनीमूनला जाणे महत्वाचे

या गोष्टी करा आणि पार्टनर सोबतच्या नात्यात गोडवा आणा

काय आहे भीमा कोरेगावचा इतिहास? 1 जानेवारी 1818 रोजी असे काय घडले, ज्यामुळे लाखो दलित बांधव या ठिकाणी येतात? वाचा सविस्तर