मुंबई | निवडणुका जवळ आल्या की सर्वच संघटानांच्या आंदोलानांना जोर चढतो. निवडणुकीच्या तोंडावर सरकारवर दबाव आणून मागण्या आपल्या पदरात पाडून घेण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. असाच इशारा आता कर्मचारी संघटनांनी दिला आहे. महाराष्ट्रतील सर्व खात्यातील अधिकारी 5 जानेवारीला सामुदायिक रजेवर जाणार आहेत. नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यात साधारण दिड लाख सरकारी कर्मचारी रजेवर जाणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
नवीन वर्षापासून सातवा वेतन आयोग लागू व्हावा, केंद्र सरकारप्रमाणे पाच दिवसांचा आठवडा असावा आणि सेवानिवृत्तीची मर्यादा वाढवून 60 वर्षं करण्यात यावी या त्यांच्या मुख्य मागण्या आहेत. तसंच रिक्त पदं तातडीनं भरण्यात यावीत अशी मागणीही महाराष्ट्र राज्य अधिकारी महासंघाने केली आहे.
संपाच्या मुद्द्यावर चर्चा सुरू असताना संप करणाऱ्यांवर कारवाई करणार अशी भूमिका दिवाकर रावते यांनी घेतली तर आपल्या मागण्य़ांसाठी संप करणं हा त्यांचा हक्क असल्याची भूमिका विनोद तावडे यांनी घेतली. याच्यावर या दोघांमघ्ये खडाजंगी झाली होती.